मोलॅसिसची निर्यात थांबल्याने साखर कारखान्यांच्या अर्थकारणावर परिणाम

कोल्हापूर : जगभरात होणाऱ्या मोलॅसिस निर्यातीमध्ये भारताचा वाटा जवळपास ३५ टक्के इतका आहे. मात्र आता केंद्र सरकारने मोलॅसिस निर्यातीवर जाचक अटी लादल्या आहेत. त्यामुळे मोलॅसिस निर्यात थांबली आहे. त्यामुळे या मोलॅसिसचे रुपांतर इथेनॉलमध्ये होऊ शकते. या निर्णयाचा परिणाम काही साखर कारखान्यांच्या अर्थकारणावर होईल असे मत साखर उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या हंगामात भारतातून ३६ हजार कोटी रुपये किमतीचे मोलॅसिस निर्यात करण्यात आले होते. यंदा आतापर्यंत सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे मोलॅसिस परदेशात निर्यात झाले आहे.

भारतीय साखर कारखान्यांमधून उत्पादित होणाऱ्या मोलॅसिसची गुणवत्ता अतिशय चांगली असल्यामुळे भारतीय मोलॅसिसला मागणी होत आहे. त्यामुळे जागातील अन्य उद्योजकांकडून मागणी होत आहे. मोलॅसिस निर्यातीमुळे इथेनॉल निर्मिती कमी होईल. इथेनॉल उत्पादन घटेल, म्हणून केंद्र शासनाने मोलॅसिस निर्यातीवर ५० टक्के निर्यात कर लावल्याचे दिसून येते. याचा काहींना फायदा, तर काहींना तोटा होईल असे साखर उद्योगाचे अभ्यासक पी. जी. मेढे यांनी सांगितले. तर विजय औताडे म्हणाले की, महाराष्ट्रातून ८ ते १० लाख टन मोलॅसिस निर्यात केले जाते. कारखान्यांना त्याचा प्रतिटन दर १३ ते १४ हजार रुपये बंदर पोहोच दर मिळत होता. यावर्षी मोलॅसिस कमी निर्यात होईल. स्थानिक बाजारात मोलॅसिसचे दर ११ ते १२ हजार रुपये टन आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here