इजिप्तकडून 50,000 टन साखर आयात

कैरो : स्थानिक बाजारपेठेतील साखरेच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी इजिप्तच्या वस्तू पुरवठा सामान्य प्राधिकरणाने (GASC) फेब्रुवारी 2024 मध्ये डिलिव्हरीसाठी 50,000 टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईला आळा घालण्यासाठी सरकारने हे पाउल उचलले आहे. जानेवारीत उसापासून साखरेचे स्थानिक उत्पादन सुरू होईल, तर बीटपासून उत्पादन मार्चमध्ये सुरू होईल, असे सरकार तर्फे सांगण्यात आले आहे.

वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी गेल्या आठवड्यात इजिप्त सरकारने साखर निर्यातीवरील बंदी तीन महिन्यांनी वाढवली आहे. पुरवठा आणि अंतर्गत व्यापार मंत्री अली मोसेली म्हणाले की, इजिप्तचे धोरणात्मक साखर साठे सुमारे आठ महिन्यांच्या स्थानिक वापराच्या गरजा पूर्ण करू शकतात. अलीकडेच पंतप्रधान मुस्तफा मादबौली यांनी साखरेच्या किमती प्रति किलोग्रॅम EGP 27 वर स्थिर होईपर्यंत, बाजारातील साखरेच्या किमतींबाबत नियमित अहवाल मागवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here