खासदार संजयकाकांचे तासगाव कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी महत्त्वाचे प्रयत्न : पालकमंत्री सुरेश खाडे

सांगली : खासदार संजयकाका पाटील यांनी बंद असणारा तासगाव कारखाना हिमतीने सुरू केला आहे. कारखान्याची क्षमता वाढवणे, डिस्टिलरी सुरू करणे, टर्बाइनऐवजी इलेक्ट्रिफायड करून विस्तारीकरणाची घोषणा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले. तासगाव कारखाना अर्थात एसजीझेड अँड एसजीए शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार संजयकाका पाटील, आ. विश्वजीत कदम, आमदार गोपीचंद पडळकर, वसंतदादा कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, हुतात्मा कारखान्याचे वैभव नायकवडी, भाजप नेते सत्यजित देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक एस. टी. वाघ आदी प्रमुख उपस्थित होते.

खासदार संजय काका पाटील म्हणाले की, पुढील हंगामात कारखान्याचे विस्तारीकरण करून क्षमता वाढवली जाईल. एसजीझेड अँड एसजीए शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने साडेतीन हजार ते चार हजार मेट्रिक टनादरम्यान ऊस गाळप करून जिल्ह्यातील इतर कारखाने देतील त्या बरोबरीने उसाला दर दिला जाईल. ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी कामगार कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने कारखाना चांगल्या पद्धतीने चालवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विशाल पाटील, वैभव नायकवडी यांनी खासदार संजय काका पाटील यांचे अभिनंदन केले. विश्वजीत कदम, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे नेते सत्यजित देशमुख, मध्यवर्ती बँकेचे एमडी एसटी वाघ यांनी शुभेच्छा दिल्या. मनमंदिर उद्योग समूहाचे अशोक भाऊ गायकवाड, सिद्धार्थ गाडगीळ, मन्सूर खतीब, सुरेश शिंदे, विटयाचे शंकर नाना मोहिते, संग्राम माने, राजाराम गरुड, जे. के. बापू जाधव, बाळासाहेब पवार, नितिन नवले, सुरेंद्र वाळवेकर, राजारामबापू पाटील, अभय जैन, भालचंद्र पाटील, डॉ. अनिल कोरबू, अरुण राजमाने, आर. एस. कुलकर्णी, प्रकाश ढंग, अरुण बालटे आदी उपस्थित होते. आर. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here