हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
केपटाऊन (दक्षिण अफ्रिका) : चीनीमंडी
साखर आयातीमुळे दक्षिण अफ्रिकेतील स्थानिक साखर उद्योगाला धोका असून, त्यावर तातडीने काही उपाययोजना आखल्या पाहिजेत, असे मत स्थानिक ऊस उत्पादकांच्या संघटनेकडून व्यक्त करण्यात आले आहे. दक्षिण अफ्रिकेचे व्यापारमंत्री रॉब डेव्हिस यांनी साऊथ अफ्रिका केन ग्रोवर्स असोसिएशनच्या (एसएसीजीए) पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी असोसिएशनकडून हे मत व्यक्त करण्यात आले. साखर आयातीच्या परिणामांची चर्चा करण्यासाठीच या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यात ऊस उत्पादकांनी सांगितले की, साखर आयातीमुळे स्थानिक बाजारपेठेला मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे आणि ही स्पर्धा टाळणेदेखील अशक्य आहे. स्थानिक साखर उद्योगाला विक्रीमध्ये खूप मोठा फटका बसत असून, प्रामुख्याने शीत पेयांच्या उद्योगाला जो साखरेचा पुरवठा होत होता, त्यात मोठी घट झाली आहे. या समस्येवर तातडीने मार्ग काढण्या संदर्भात स्थानिक साखर उद्योगाकडून आग्रह धरण्यात आला. त्यावर प्रदीर्घ चर्चाही झाली. त्यात स्थानिक साखर उद्योगासाठी दूरदृष्टीची गरज आहे. जागतिक घडामोडींच्या स्थानिक बाजारावर होणारा परिणाम टाळण्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे.
मंत्रालयाचे प्रतिनिधी आणि एसएसीजीए दोन्हीकडून स्थानिक साखर उद्योगाला असलेल्या संभाव्य धोक्याविषयी सहमती दर्शवण्यात आली. विशेषतः यामुळे बेरोजगारी वाढली असून, त्यामुळे त्यावर तातडीने उपाय-योजना करण्यावर एकमत घेतली. यात शॉर्ट टर्म, मिडयम टर्म आणि लाँग टर्म नियोजन करण्याला सगळ्यांनी मान्यता दिली.