यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता 

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा

यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा नदी प्रकल्पास 2013-14 च्या दरसूचीनुसार 3 हजार 517 कोटींच्या किंमतीस चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त 5 तालुक्यांतील 52 हजार 423 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त नेर, बाभुळगाव, कळंब, राळेगाव आणि मारेगाव या तालुक्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाचा समावेश 2015-16 मध्ये केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत करण्यात आला आहे. या योजनेमध्ये हा प्रकल्प तृतीय प्राधान्याने पूर्ण करावयाचा असून प्रकल्पीय कामे डिसेंबर 2019 अखेर व CAD-WMची कामे जून-2020 अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here