पेरणीत होणार सुधारणा, मान्सून देशभर पसरला

नवी दिल्ली : देशातील कृषी उत्पादन क्षेत्र मानल्या जाणाऱ्या उत्तर – पश्चिम क्षेत्रात पुढील काही काळात सातत्याने पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पेरण्यांच्या कामाला गती मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नियमित कालावधीत पाच दिवसांच्या उशीरानंतर मंगळवारी मान्सूनने देशभरात हजेरी लावली आहे. दक्षिण – पश्चिम मान्सून दिल्लीसह देशातील उर्वरीत राज्य, उत्तर प्रदेशचा उर्वरीत भाग, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानकडे सरकला आहे. त्यामुळे मान्सूनने ८ जुलै रोजीची पसरण्याची प्रक्रिया १३ जुलै रोजी पूर्ण केली आहे.

हवामान विभागाने सांगितले की, मुख्यत्वे बंगालच्या खाडीत वरच्या स्तरावर कमी दबावाचा पट्टा तयार न झाल्याने मान्सूनला पुढे सरकरण्यासाठी मदत मिळाली आहे. एक जून ते १३ जुलै या कालावधीत मान्सूनचा पाऊस २६.३ सेंटीमिटर झाला. सरासरी दिर्घकालीन पावसापेक्षा तो ६ टक्क्यांनी कमी आहे. १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कमी पाऊस झाला आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहारमध्ये आतापर्यंत सर्वाधिक पाऊस झाला आहे.

सुरुवातीला मान्सून देशात पोहोचण्याची तारीख १५ जुलै होती. आयएमडीने गेल्या वर्षी काही भागांमध्ये पाऊस सुरू होण्याच्या तारखेत सुधारणा केली. मंगळवारी राजधानी दिल्लीच्या अनेक भागात पाऊस झाला. त्यामुळे आयएमडीने मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली. मात्र, उत्तर-पश्चिम क्षेत्राला पावसाची प्रतीक्षा होती. राजस्थान, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात ८ धरणांचा जलस्तर ८ जुलैपर्यंत एकूण क्षमतेच्या १७ टक्केच होता. तर गेल्या दहा वर्षात हा जलस्तर ३५ टक्के आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण पेरणीयोग्य क्षेत्रापैकी निम्म्या क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here