२०२२ मध्ये कच्ची साखर १८-२० सेंट/lb दरम्यान राहण्याची शक्यता : StoneX

412

न्यूयॉर्क : प्रमुख देशांतील साखरेचे जादा उत्पादन आणि कमी मागणीचा परिणाम थेट किमतीवर पडण्याची शक्यता आहे, असे ब्रोकरेज फर्म स्टोनएक्सने (StoneX) म्हटले आहे. त्यामुळे कच्च्या साखरेचा दर २०२२ मध्ये १८ ते २० सेंट प्रती पाऊंड या दरम्यान राहतील असे अनुमान व्यक्त केले आहे.

स्टोनएक्सने शुगर ऑनलाइन द्वारे आयोजित एका सेमिनारमध्ये सांगितले की, ऑक्टोबर ते सप्टेंबर या कालावधीत सुरू राहणाऱ्या २०२१-२२ या हंगामात १.८ मिलियन टनाच्या तिसऱ्या जागतिक पुरवठ्यातील कमतरतेच्या अनुमानानंतर भारत, युरोप आणि थायलंडमध्ये उच्चांकी उत्पादन आणि ब्राझीलमधील चांगल्या हंगामामुळे किमती मर्यादेत राहतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

याबाबत रॉयटर्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, स्टोनएक्समधील साखर आणि इथेनॉलचे प्रमुख ब्रुनो लिमा यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की, भारत जवळपास २१ सेंट या किमतीवरच साखरेची निर्यात बाजारपेठेत करू इच्छित आहे. मात्र, आम्हाला असे वाटते की ते यापेक्षा कमी किमतीत निर्यात करतील. भारतातील उसाचे उच्चांकी उत्पादनामुळे साखरेच्या किमतीवर दबाव आला आहे. ब्राझीलच्या मध्य आणि दक्षिण क्षेत्रात २०२२-२३ मध्ये अपेक्षेपेक्षा चांगले उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here