ऑगस्ट महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाचे ४० हजारांपेक्षा कमी रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाबाबत दिलासादायक वृत्त समोर येत आहे. ऑगस्ट महिन्यात दुसऱ्यांदा कोरोना रुग्णसंख्या ४० हजारांपेक्षा कमी आहे. मात्र, मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भारतात एका दिवसात कोरोनाचे ३८,६२८ नवे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ३,१८,९५,३८५ झाली आहे. तर ६१७ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ४,२७,३७१ झाली आहे. एकूण संक्रमणाच्या १.२९ टक्के जणांचा मृत्यू झाला आहे. कोविडमधून बरे होण्याची टक्केवारी ९७.३७ इतकी आहे.

मंत्रालयाने सांगितले की, गेल्या २४ तासात कोविडच्या उपचारातील रुग्णसंख्येत २००६ जणांची झाली आहे. शुक्रवारी १७,५०,०८१ जणांची तपासणी करण्यात आली. एकूण ४७,८३,१६,९६४ जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ३,१०,५५,८६१ इतकी झाली आहे. तर मृत्यूदर १.३४ टक्के आहे. आतापर्यंत ५०.१० कोटी लसीकरण झाले आहे.

देशात गेल्यावर्षी ७ ऑगस्ट रोजी संक्रमितांची संख्या २० लाख होती. २३ ऑगस्ट रोजी ३० लाख, पाच सप्टेंबर रोजी ४० लाख झाली होती. रुगणसंख्या १६ सप्टेंबर रोजी ५० लाख, २८ सप्टेंबरला ६० लाख, ११ ऑक्टोबरला ७० लाख, २९ ऑक्टोबरला ८० लाख, २० नोव्हेंबरला ९० लाख झाली. १९ डिसेंबर रोजी रुग्णसंख्या एक कोटीवर पोहोचली. चार मे रोजी ही संख्या दोन कोटी आणि २३ जून रोजी तीन कोटी झाली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here