ब्राझीलमध्ये कोरोनाचे नवे १५२३९ रुग्ण, ५७० जणांचा मृत्यू

ब्रासिलिया : ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासात कोरोना व्हायरसचे नवे १५,२३९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना संक्रमितांची संख्या २,१६,२७,४७६ वर पोहोचली आहे.

ब्राझीलच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा ही माहिती दिली. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत तब्बल ५७० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या या मृतांच्या संख्येनंतर एकूण मृतांचा आकडा ६,०२,६६९ वर पोहोचला आहे. त्याआधी देशात कोरोनाचे नवे १४,२८८ रुग्ण आढळले होते. तर ५२५ जणांचा मृत्यू झाला होता.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here