हरियाणात गळीत हंगाम २०२१-२२ सुरू, चांगल्या साखर उताऱ्याची अपेक्षा

हरियाणात ऊस गळीत हंगाम २०२१-२२ला सुरुवात झाली आहे. सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल यांनी पलवल सहकारी साखर कारखान्याच्या गव्हाणीत मोळी टाकून याची सुरुवात केली. यावर्षी जवळपास ४० लाख क्विंटल ऊस गाळपास उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. यंदा पूर्वहंगामी प्रजातीचा ७० टक्के ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे साखरेचा चांगला उतारा मिळू शकेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मंत्री बनवारी लाल यांनी हरियाणा सरकार उसाला सर्वाधिक दर देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पूर्वहंगामी उसाला ३६२ रुपये, हंगामी तसेच आडसाली लागणीच्या उसाचा ३५५ रुपये प्रती क्विंटल दर दिला जात आहे. हंगामात ४० लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. ९.८० टक्के उताऱ्यासह ३.९२ लाख क्विंटल उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्यावर्षी २०२०-२१ मध्ये पलवल शुगर मिलने ९३.२२ टक्के कॅपिटल युटिलायझेशन केले. तर साखर उतारा ९.४७ टक्के इतका होता. पलवल साखर कारखान्यात गुळाचे उत्पादनही सुरू करण्यात आले आहे. आता इथेनॉल उत्पादनाच्या दृष्टीने तयारी सुरू असलेल्या मंत्री डॉ. बनवारी लाल यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी अटल कँटिन योजना, शेतकऱ्यांना यार्डात राहण्यासाठी गेस्ट हाऊस, आरओ पाणी, विश्रामगृहात टीव्हीची सुविधा, उसावरील किड तसेच रोग रोखण्यासाठी १० टक्के अनुदानावर औषधांचे वितरण केले जात आहे. ऊसाचे बियाणे बिनव्याजी रुपात दिले जात आहे. दरम्यान, ऊस उत्पादकांना वेळेवर ऊस बिले दिली जात आहेत. कोणाचीही थकबाकी शिल्लक नाही असे शुगरफेडचे चेअरमन रामकरण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here