भारतामध्ये आता होऊ शकते ऊसा ऐवजी शुगर बीट ची शेती

तामिळनाडू : तामिळनाडू कृषी विद्यापीठामध्ये (TNAU) ऊसाला पर्याय असणाऱ्या शुगर बीट ची साध्यता व अभ्यास यांवरती अभ्यास करण्यासाठी संपूर्ण सुविधा उपलब्ध आहेत. त्यासाठी TNAU बेल्जियम स्थित फर्म सेसवेंडरहैवे यांच्या सोबत सहयोगाने कार्य करत आहेत. TNAU चे कुलगुरू एन कुमार असे म्हणाले कि,  बेल्जियम मधील फर्म  ने शुगर बीट चे असे वाण विकसित केले आहे कि जे उष्णकटीबंधी भागामध्ये सुद्धा केले जाऊ शकते. सेसवेंडरहैवे फर्म आम्हाला बीट चे बियाणे देईल जे आम्ही कोईमतूर,मदुराई, वैगाई धरण, कडालूर, सिरूगमणी आणि मेलाथूर या प्रदेशात त्यांची लागवड करू.परीक्षण केल्यानंतर ते बियाणे आम्ही शेतकरी व कारखान्यांना लागवडी साठी देऊ. तसेच ते असे म्हणाले कि, सेसवेंडरहैवे फर्म चे प्रतिनिधी शेतीचे निरीक्षण करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी येतील.

डीसेंबर मध्ये याचा प्रयोग होणार असून मार्च-एप्रिल मध्ये याची शेती करण्याचे नियोजन आहे. ऊस शेती साठी खूप पाणी लागते तर शुगर बीट साठी त्या तुलनेत कमी पाणी लागते. तज्ज्ञांच्या अनुसार भारत आणि ब्राझील सोडून संपूर्ण जगामध्ये शुगर बीट पासून साखरेची निर्मिती केली जाते. ग्लोबल कृषी सिस्टम प्राइवेट लिमिटेड चे अध्यक्ष गोकुल पटनायक असे म्हणाले कि, १० महिन्यांच्या ऊस शेतीच्या तुलनेत साडे चार महिन्यातच शुगर बीट ची कापणी  केली जाऊ शकते. इतकेच नाही तर शुगर बीट इथेनॉल बनवण्यासाठी उत्कृष्ट संसाधन आहे. ज्याचा उपयोग डिझेल मध्ये मिश्रणासाठी केला जातो. तज्ज्ञांच्या म्हण्यानुसार १० महिन्यात १ हेक्टर मध्ये १०० टन उत्पादन येते तर शुगर बीट चे शेती ४ महिन्यात ७० टन प्रति हेक्टर उत्पादन देते.

वसंतरावदा शुगर इंस्टीट्यूट (पुणे) चे महासंचालक शिवाजीराव देशमुख असे म्हणाले की, आम्ही गेल्या १२ वर्षांपासून शुगर बीट चे अध्ययन करत आहेत आणि ३०० एकर मध्ये त्याची शेती केली होती. शुगर बीट एक पालेभाजी वर्गीय पिक असलेने ऊसाच्या तुलनेत त्याची जास्ती देखभाल करणे गरजेचे असते. आणि आम्ही शेतकऱ्यांना हे शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here