नवी दिल्ली : तसे पाहिले तर आजकाल बँकांशी संबंधित कोणतेही काम ऑनलाइन पूर्ण केले जाते. मात्र, काही कामे अशी आहे, की ज्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागते. जन महिन्यातही उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात टिकून राहतील. अशा परिस्थितीत बँका कधी-कधी बंद आहेत, याची यादी जाणून घेणे हितावह ठरेल. भारतीय रिझर्व्ह बँकेकडील (RBI) माहितीनुसार विविध दिवशी प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या सुट्टी असतात. फक्त प्रत्येक दुसरा शनिवार आणि सर्व रविवारी सुट्टी ही सर्वत्र एकाचवेळी असते. याशिवाय गॅझेटेड सुट्ट्यांदिवशीही सर्व बँका बंद असतात.
आजकतने दिलेल्या वृत्तानुसार, जून महिन्यात बँकांना पहिली सुट्टी महाराणा प्रताप जयंतीची असेल. मात्र, या दिवशी बँका फक्त हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे बंद राहतील. या दिवशी सर्व सरकारी, खासगी, विदेशी, को-ऑपरेटिव्ह आणि रिजनल बँका बंद राहतील. याशिवाय दुसरी सुट्टी १५ जून रोजी असेल. या दिवशी देशाच्या काही भागात हरगोविंद सिंह जयंती तर काही ठिकाणी, राजा संक्रांत आणि काही भागात YMA Day असेल. या दिवशी फक्त आयजोल, भुवनेश्वर, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील. जून महिन्यात कोणताही मोठा सण अथवा सार्वजनिक सुट्टी नाही. त्यामुळे उर्वरीत महिन्यात फक्त रविवार आणि दुसऱ्या शनिवारी सुट्टी असेल. बँका ५ जून, ११ जून, १२ जून, १९ जून, २५ जून आणि २६ जून रोजी बंद राहतील.