गेल्या १० वर्षात इथेनॉल विक्रीतून साखर कारखान्यांनी मिळवला ९४,०० कोटींचा महसूल : सरकार

नवी दिल्ली : गेल्या १० वर्षांत साखर कारखान्यांनी इथेनॉलच्या विक्रीतून ९४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला आहे. त्यामुळे साखर उत्पादनास मदत झाली आहे. साखर कारखान्यांचे उत्पन्न वाढले आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. देशात ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत इथेनॉल उत्पादन क्षमता सुमारे १३८० कोटी लिटर आहे. त्यापैकी सुमारे ८७५ कोटी लिटर मोलॅसिसवर आधारित आहे. उर्वरीत ५०५ कोटी लिटर धान्यावर आधारित आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.

मंत्र्यांनी सांगितले की, नव्या इथेनॉल डिस्टिलरीजची स्थापना, सध्याच्या इथेनॉल डिस्टिलरीजच्या विस्तारामुळे शहरी आणि ग्रामीण भागात ४०,००० कोटींहून अधिक गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सरकारच्या प्रभावी धोरणांमुळे इंधन वितरण कंपन्यांचा इथेनॉल पुरवठा २०१३-१४ मधील ३८ कोटी लिटरवरून २०२२-२३ मध्ये १३ पट वाढून ५०२ कोटी लिटरवर आला. मिश्रणाची टक्केवारी १.५३ टक्केवरुन १२ टक्क्यांच्या उद्दिष्टांपर्यंत आली आहे. इथेनॉल विक्रीमुळे शेतकऱ्यांना उसाची बिले त्वरीत मिळतात. कारखान्यांनी साखर हंगाम २०२२-२३ मध्ये शेतकर्‍यांच्या उसाच्या थकबाकीपैकी ९८.३ टक्के आणि मागील हंगाम २०२१-२२ मध्ये उसाच्या थकबाकीपैकी ९९.९ टक्के रक्कम दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here