एका दिवसात समोर आले 54 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण, कोरोनामुक्तांची संख्या 67 लाखावर

122

नवी दिल्ली: भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी तीन महिन्यामध्ये पहिल्यांदाच 47 हजारापेक्षा कमी दैनिक रुग्ण समोर आल्यानंतर आज म्हणजेच बुधवारी 54 हजारापेक्षा अधिक रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. याशिवाय देशामध्ये कोविड 19 मुळे होणार्‍या मृत्युमध्ये वाढ झाली आहे. तर देशामध्ये संक्रमितांची संख्या 76 लाखा वर गेली आहे. तर कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 67 लाखापेक्षा अधिक आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयांच्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासात 54,044 इतके कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर दरम्यान, 717 लोकांनी कोरोनामुळे आपला जिव गमावला आहे. देशामध्ये कोविड 19 च्या एकूण संक्रमितांची संख्या 76,51,108 झाली आहे.

आकड्यांनुसार, देशामध्ये आतापर्यंत 67,95,103 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात एकूण 61,775 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 7,40,090 आहे, ज्यामध्ये गेल्या 24 तासात 8,448 रुग्ण कमी झाले आहेत. सक्रिय रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यातील संख्येच्या अंतरामध्ये वाढ होत आहे. तर या कोरोनामुळे आतापर्यंत देशामध्ये एकूण 1,15,914 लोकांचा मृत्यु झाला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here