राजस्थानमध्ये पाऊस बनला शेतकऱ्यांचा वैरी, कोटा विभागात २ लाख हेक्टरमधील पिके खराब

जयपूर : राजस्थानमध्ये आधी उशीरा आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली. तर आता जोरदार पाऊस शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे. कोटा विभागात जादा पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून आतापर्यंत केलेल्या सर्व्हेनुसार सोयाबीन आणि उडीद पिकाचे दोन लाख हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने नष्ट झाले आहे. कोटा, बारा, बुंदी जिल्ह्यात व्यापक प्रमाणात उडीत आणि सोयाबीन या पिकांचे नुकसान होते. कृषी विभागाच्या अहवालानुसार, ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या काळात सोयाबीनचे १ लाख ४८ हजार ४७७ हेक्टर क्षेत्र जोरदार पावसामुळे नुकसानीत आले आहे.

यासोबतच उडीदाचे एकूण ५४ हजार २६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे खराब झाले आहे. सोयीबीनच्या पिकात १० ते ८५ टक्क्यांपर्यंत नुकसान नोंदविण्यात आले आहे. तर उडीद पिकाचे २० ते ९० टक्क्यांचे नुकसान झाले आहे. यासोबतच भाजीपाला पिके, तांदूळ, तीळ आदींचेही नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोटा विभागातील तीन जिल्ह्यांपैकी कोटा, बारा आणि बंदीमध्ये अधिक नुकसान झाले आहे. कोटामध्ये २४ हजार ४०० हेक्टरमध्ये उडीद पिक होते. तर सोयाबीनची पेरणी १ लाख १७ हजार २०० हेक्टरमध्ये करण्यात आली होती. कोटा जिल्ह्यातील लाडपुरा, सांगोद, रामगंजमंडी, दिगोद, पिपलदा आदी भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील बारा जिल्ह्यात नुकसान नोंदविण्यात आले आहे. यामध्ये अंता, मांगरोल, किशनगंज, शाहबाद, अटरू, छबडा, छिपाबडौल आदींचा समावेश आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here