राजस्थानमध्ये सेंद्रिय ऊसाचा वाढणार गोडवा, जैविक शेतीला प्राधान्य

66

झालावाड़ : सेंद्रिय शेतीसाठी पद्मश्री पुरस्कार प्राप्त मानपुरातील प्रगतशील शेतकरी हुकुमचंद पाटीदार हे देशभरात जैविक शेतीचा प्रसार करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. देशभरातील शेतकरी पाटीदार यांच्याकडून याविषयी माहिती घेत आहेत.
पाटीदार यांनीही सेंद्रिय शेतीच्या प्रसराची तयारी सुरू केली आहे. त्यांनी रोपे तयार केली आहेत. हा ऊस नेहमीपेक्षा अधिक मोठा असतो. त्याचा गोडवाही जास्त असतो. त्याची चव चांगली लागते. खरीप हंगामात सोयाबीन, मक्का, उडिद, मुग यांचीही जैविक शेती केली जाते. याबाबत पाटीदार यांनी सांगितले की, माती टिकवण्यासाठी, वाचवण्यासाठी जैविक शेती हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सरकारी स्तरावर जैविक शेतीला पाठबळ दिले जात आहे ही चांगली बाब आहे.

पत्रिकामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कोटा येथील प्रगतशील शेतकरी आणि भाजप मोर्चाचे माजी जिल्हा महामंत्री हुसेन देशवाली यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने झालावाड जिल्ह्यातील असनावरमधील मानपुरा गावात पद्मश्री पुरस्कारप्राप्त शेतकरी पाटीदार यांच्याकडून जैविक शेतीची माहिती घेतली. पाटीदार यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, आपली शेते जैविक बनविण्याची गरज आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील २२ गावांतील शेतकरी जैविक शेती करत असल्याचे त्यांनी सांगितले. बियाण्यांपासून लावणीपर्यंत यासाठीची साखळी विकसित करण्यात आली आहे. पाटीदार यांनी जैविक बियाणेही तयार केले आहे. पाटीदार यांनी आपल्या शेतात जैविक ऊस पिकवला आहे. त्याचा गोडवा नेहमीच्या उसापेक्षा अधिक आहे. जैविक शेतीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी हरिमोहन मिणा आणि एसपी किरण कंग सिद्धू यांनीही माहिती घेतली होती, असे पाटीदार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here