२०२०-२१ हंगामात साखर कारखान्यांनी ४,४४५ कोटींची ऊस बिले थकवली

नवी दिल्ली : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या उसाचे ऑक्टोबर २०२०- सप्टेंबर २०२१ या हंगामातील ४ हजार ४४५ कोटी रुपये अद्याप थकवले आहेत. पैसे देण्यास उशीर केला जात असल्यानेमुळे देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सर्व राज्य सरकारांकडून साखर कारखान्यांना अल्टिमेटम दिला जातो. तरीही अनेक कारखाने पैसे देण्यात अपयशी ठरले आहेत.

अन्न राज्य मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार २०२०-२१ या हंगामात एकूण ९२,८०४ कोटी रुपायांची ऊस बिले दिली जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ८८,३५९ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. तर ४,४४५ कोटी रुपयांची अद्याप थकाकी आहे.

२०२०-२१ या हंगामात सर्वाधिक थकबाकी उत्तर प्रदेशातील कारखान्यांची आहे. त्यांनी ३७५२ कोटी रुपयांची ऊस बिले थकवली आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात ३९४ कोटी रुपये, छत्तीसगडमध्ये ६४ कोटी रुपये, हरियाणात ६३ कोटी रुपये थकीत आहेत. तर उत्तराखंडमधील शेतकऱ्यांचे जवळपास ५२ कोटी रुपये, गुजरातमध्ये ४४ कोटी रुपये, आंध्र प्रदेशमध्ये ३७ कोटी रुपये थकविण्यात आले आहेत. तामीळनाडूत २५ कोटी रुपये आणि पंजाबमध्ये ९ कोटी रुपये अद्याप शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here