गेल्या २४ तासात कोरोनाचे नवे १४ हजार रुग्ण, १०१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात कोरोना महामारीचे नवे १४००० नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात नवे १३ हजार ९९३ रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या १,०९,७७,३८७ झाली आहे. शुक्रवारी नवे १३,१९२ रुग्ण आढळले होते. दरम्यान, गेल्या २४ तासांत १०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १,५२,२१२ लोकांचा या घातक विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. पु्न्हा एकदा कोरोना रुग्णांत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात १०३०७ रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १,०६,७८,०४८ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. दररोज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा अॅक्टिव्ह रुग्णसंख्या वाढली आहे. देशात सध्या १,४३,१२७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण १.२७ टक्के रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

देशात जवळजवळ २२ दिवसांच्या संक्रमणानंतर १४००० रुग्ण वाढले आहेत. यापूर्वी २९ जानेवारी रोजी १८,८५५ रुग्ण आढळले होते. तर कोरोना संक्रमणामध्ये १६ सप्टेंबर रोजी ५० लाख, २८ सप्टेंबर रोजी ६० लाख, ११ ऑक्टोबर रोजी ७० लाख, २९ ऑक्टोबर रोजी ८० लाख आणि २० नोव्हेंबर रोजी ९० लाख आणि १९ डिसेंबर रोजी एक कोटी रुग्ण झाले होते.
भारतीयआयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या (आयईसीएमआर) म्हणण्यानुसार, देशात १९ फेब्रुवारी रोजी २१,०२,६१४८० रुग्णांची तपासणी झाली आहे. त्यापैकी ७८६६१८ रुग्णांची तपासणी शुक्रवारी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here