देशात गेल्या २४ तासात नवे २,०८,९२१ कोरोना रुग्ण, ४१५७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात नवे २,०८,९२१ रुग्ण आढळून आले असून देशातील एकूण संक्रमितांची संख्या २,७१,५७,७९५ झाली. तर देशात मंगळवारी एका दिवसात सर्वाधिक २२,१७,३२० नमुने तपासण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात संक्रमणामुळे ४१५७ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ३,११,३८८ झाली आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, मंगळवारी देशात सर्वाधिक २२,१७,३२० नमुन्यांची तपासणी झाली. आतापर्यंत एकूण ३३,४८,११,४९६ नमुने तपासण्यात आले असून संक्रमितांची टक्केवारी ९.४२ इतकी आहे. मंत्रालयाने सांगितले की, देशात सलग दुसऱ्या दिवशी नमुने तपासणीत आढळणाऱ्या संक्रमितांची संख्या १० टक्क्यांहून कमी आहे. संक्रमणाचा साप्ताहीक दर कमी होऊन ११.४५ टक्क्यांवर आला.

दरम्यान, देशात अद्याप २४,९५,५९१ जणांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ९.१९ टक्के आहे. तर २,४३,५०,८१६ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्ण बरा होण्याची टक्केवारी ८९.६६ इतकी असून मृत्यूदर १.१५ टक्के आहे. देशात गेल्या वर्षी सात ऑगष्ट रोजी संक्रमितांची संख्या २० लाखावर गेली. नंतर २३ ऑगष्टला ३० लाख, पाच सप्टेंबरला ४० लाख, १६ सप्टेंबरला ५० लाख, २८ सप्टेंबरला ६० लाख संक्रमीत झाले होते. त्यानंतर ११ ऑक्टोबरला ७० लाख, २९ ऑक्टोबरला ८० लाखांवर रुग्ण झाले. २० नोव्हेंबरला ही संख्या ९० लाखांवर गेली. तर १९ डिसेंबरला ही संख्या एक कोटी आणि चार मे रोजी दोन कोटीवर पोहोचली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here