भारतामध्ये गेल्या 24 तासात कोविडचे सर्वात जास्त 66,999 नवे रुग्ण, 942 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतासह जगभरातील 180 पेक्षा जास्त देशामध्ये कोरोनाचा हाहाकार पहायला मिळत आहे. आतापर्यंत 2.6 करोड पेक्षा अधिक लोक या संक्रमणाचे शिकार झाले आहेत. या वायरसने 7.49 लाख रुग्णांचा जिव घेतला आहे. भारतातही प्रत्येक दिवशी कोरोनाचे रुग्णवाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार देशामद्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 23,96,637 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोंनाचे 66,999 इतके नवे रुग्ण समोर आले आहेत. एका दिवसामद्ये समोर येणार्‍या रुग्णांमध्ये ही संख्या आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.

या दरम्यान देशामध्ये 942 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 16,95,982 रुग्ण बरे झाले आहेत आणि आतापर्यंत एकूण 47,033 लोकाचा मृत्यू झाला आहे. रिकवरी रेट बाबत बोलायचे झाल्यास या किरकोळ वाढीनंतर 70.76 टक्क्यांवर पोचला आहे. पॉजिटिवीटी रेट 8.06 टक्के आहे. 12 ऑगस्टला 8,30,391 कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. देशामध्ये आतापर्यंत एकूण 2,68,45,688 सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत.

देशाच्या जवळपास सर्व राज्यांमधून कोरोना रुग्ण समोर येत आहेत.अनेक राज्ये कोरोनामुक्तही झाली होती, पण प्रवासी राज्यात दाखल झाल्याने पुन्हा इथे संक्रमण वाढले आहे. गेल्या 24 तासांमध्ये ज्या पाच राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वात अधिक रुग्ण आढळले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र (12,712 रुग्ण), आंध्र प्रदेश (9597 रुग्ण), कर्नाटक (7883 रुग्ण), तामिळनाडू (5871 रुग्ण) आणि उत्तर प्रदेश (4475 रुग्ण).

दरम्यान महाराष्ट्रामध्ये 344 रुग्णांचा मृत्यू, तामिळनाडूमध्ये 119, कर्नाटकमध्ये 112, आंध्रप्रदेशामध्ये 93 आणि उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल मध्ये 54-54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here