ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बंद राहाणार बँका, जाणून घ्या कधी

40

वर्ष २०२२ चा सध्या सातवा महिना सुरू आहे. आणखी काही दिवसांत आठव्या, ऑगस्ट महिन्याला सुरुवात होईल. अशाच जर तुम्हाला बँकेसंबंधी महत्त्वाची कामे आटोपायची असतील तर त्या महिन्यातील सुट्ट्यांची यादी तपासा. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या हॉलिडे लिस्टनुसार या महन्यात देशात वेगवेगळ्या राज्यांत एकूण १३ दिवस बँका बंद राहतील. ऑगस्ट हा महिना विविध सण, उत्सवांचा आहे. यामध्ये स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी अशा सणांचा समावेश आहे. या महिन्यात शनिवार, रविवारच्या सुट्ट्यांसह तेरा दिवस बँका बंद राहतील.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, एक ऑगस्ट रोजी गंगटोक येथे द्रुपका शे-जी सणामुळे बँका बंद राहतील. तर ७ ऑगस्ट रोजी पहिला रविवार आहे. ८ ऑगस्ट रोजी मोहर्रम असल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बँका बंद असतील. ९ ऑगस्ट रोजी, चंदीगड, गुवाहाटी, इंफाळ, डेहरादून, शिमला, तिरुअनंतपुरम, भुवनेश्वर, जम्मू, पणजी, शिलाँग वगळता देशभरात सुट्टी असेल. ११ ऑगस्ट रोजी देशभर रक्षाबंधनाची सुट्टी आहे. १३ ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार तर १४ ऑगस्टला रविवार आहे. सोमवारी १५ ऑगस्टची सुट्टी असेल. १६ ऑगस्ट रोजी पारसी नववर्षीची सुट्टी मुंबई आणि नागपूरमध्ये असेल. १८ ऑगस्ट रोजी जन्माष्टमीची देशभर सुट्टी आहे. त्यानंतर २१ आणि २८ ऑगस्ट रोजी रविवार आहे. ३१ ऑगस्ट रोजी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये गणेश चतुर्थीची सुट्टी राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here