यशवंत कारखाना निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या तोफा धडाडू लागल्या

पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपाच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहचला आहे. कारखान्याची निवडणूक तब्बल १३ वर्षांनी होत असल्याने कोण बाजी मारणार याकडे सभासदांचे लक्ष्य लागले आहे. विशेष म्हणजे कारखाना सध्या बंद अवस्थेत आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक प्रक्रिया सुरू असून दोन प्रमुख पॅनेलसह ५० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल व अण्णासाहेब मगर शेतकरी आघाडी सभासदांना आपल्याकडे खेचण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. कारखाना लवकरात लाव्ब्क्र सुरु करावा, अशी मागणी शेतकरी, सभासद करीत आहेत. सभासद आपले मत कोणाच्या पारड्यात टाकणार याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here