ऊत्तराखंडमध्ये उस थकबाकी भागवण्याच्या मुद्द्यावरुन तापले राजकारण

देहरादून: ऊस थकबाकी भागवण्याच्या मुद्यावरुन मंत्री मदन कौशिक यांच्यावर दिशाभूल करणे आणि सदस्यांना चुकीची माहिती देण्याचा आरोप करुन, काँग्रेस आमदार काजी निजामुद्दीन यांनी विधासभेमध्ये विशेषाधिकाराचे हनन करण्याची नोटीस दिली. त्यांनी सांगितले की, मंत्र्यांनी मंगळवारी दावा केला होता की, वर्ष 2019-20 साठी ऊस शेतकर्‍यांचे सर्व देय भागवले आहे. काजी यांनी सांगितले की, त्यांना माहिती मिळाली की, इकबालपूर सागर कारखान्याकडून 10 करोड रुपये अजूनही देय आहेत.

मंत्री कौशिक यांनी सांगितले की, कारखान्याने सहकारी समितीकडे पैसे दिले आहेत, जे लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केले जातील. यावर स्पीकर प्रेमचंद अग्रवाल यांनी सांगितले की, मंत्री आणि काजी दोघेही आपल्या जागेवर बरोबर आहेत आणि यासाठी हा मुद्दा पुढे वाढवला जावू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here