पेट्रोल, डिझेलच्या किमतींच्या तुलनेत एफआरपीतील वाढ अपुरी: नरेश टिकैत

82

मुझफ्फरनगर : केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीएमध्ये केलेली ५० रुपये प्रतीटन वाढ ही पेट्रोल आणि डिझेलच्या दराच्या तुलनेत अपुरी असल्याचा दावा भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांनी केला आहे. केंद्र सरकारने बुधवारी आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी उसाचा योग्य आणि लाभदायी मूल्य (एफआरपी) ५० रुपये प्रतीटनाने वाढवले. मात्र, साखर विक्रीच्या दरात तत्काळ वाढ करण्यास नकार दिला आहे. आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीने बैठकीत हा निर्णय घेतला.

याबाबत पत्रकारांशी बोलताना टिकैत म्हणाले, सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये केलेली वाढ शेतकऱ्यांना मान्य नाही. कारण, पेट्रोल, डिझेलच्या किमतीच्या तुलनेत ही वाढ अपुरी आहे. पेट्रोल, डिझेल आणि इतर वस्तूंच्या दरवाढीच्या तुलनेत उसाच्या योग्य आणि लाभदारी दराची वाढ समान असली पाहिजे. त्यामुळे शेतकरी आपले पिक वाढवू शकतात अशी मागणी टिकैत यांनी केली.

सरकारने गळीत हंगाम २०२१-२२ साठी उसाची एफआरपी २९० रुपये प्रती क्विंटल निश्चित केली आहे. सरकारने सांगितले की, बेसिक रिकव्हरी दर १० टक्क्यांसाठी एफआरपी २९० रुपये प्रती क्विंटल निश्चित केली आहे. गेल्या हंगामात सराकरने एफआरपी १० रुपये प्रती क्विंटलने वाढवू २८५ रुपये केली होती. ऊस उत्पादक गेल्या अनेक महिन्यांपासून दरात वाढीची मागणी करत आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here