हरियाणामधील उसाच्या दरातील वाढ अपुरी: भूपेंद्रसिंह हुड्डा

चंदीगड : हरियाणा सरकारने केलेली उसाची दरवाढ ही अत्यंत अपुरी असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी केली.

याबाबत हुड्डा म्हणाले, सत्तारुढी भाजप-जजप सरकारने उसाचा दर फक्त १२ रुपयांनी वाढवला आहे. इतकी कमी दरवाढ करुन भाजप याचा जोरदार प्रचार आणि इव्हेंटबाजी करीत आहे. वास्तविक शेतीसाठी येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत सर्व पिकांची एमएसपी आणि उसाची दरवाढ ही खूप कमी आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले हुड्डा म्हणाले, यापूर्वी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात साडेनऊ वर्षात उसाचा दर १६५ रुपयांनी वाढविण्यात आला होता. म्हणजेच दरवर्षी १६ टक्क्यांहून अदिक वाढ काँग्रेस सरकारने दिली होती. मात्र भाजप सरकारने गेल्या सात वर्षात एकूण १६ टक्के म्हणजे काँग्रेसच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी दरवाढ करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री हुड्डा यांच्या म्हणण्यानुसार, हरियाणामध्ये २०००५ पर्यंत शेतकऱ्यांना फक्त ११७ रुपये प्रती क्विंटल ऊस दर दिला जात होता. मात्र, काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर यामध्ये ऐतिहासिक १९३ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेत दर ३१० रुपये क्विंटलवर पहोचवला. तर भाजप सरकारने गेल्या सात वर्षात फक्त ५२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ अत्यंत अपुरी आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here