‘रेणा’चा बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ

लातूर : रेणापूर तालुक्यातील (दिलीपनगर) निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्याचा १८ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाणीत ऊस मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, सौ. सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आ. अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, संत शिरोमणी कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, लातूर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, ‘मांजरा’चे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे, २१शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, संत शिरोमणीचे व्हा. चेअरमन शाम भोसले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्री, उपसभापती शेषेराव हाके, लातूर जिल्हा बँकेच्या संचालीका सौ. स्वयंप्रभा पाटील, चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक चेअरमन सर्जेराव मोरे यांनी केले.

याप्रसंगी बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभासाठी कारखान्याच्या पाच विभागातून प्रथम आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व कारखान्याचे संचालक धनराज देशमुख यांच्या हस्ते सपत्निक होम हवन व गव्हाण पूजन झाले. सुत्रसंचालन संचालक अनिल कुटवाड यांनी केले. या कार्यक्रमास संचालक धनराज देशमुख, संजय हरिदास, चंद्रकांत सुर्यवंशी, संग्राम माटेकर, प्रविण पाटील आदी उपस्थित होते. आभार कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here