हरियाणा सरकारकडून नुकसानभरपाईत १२,००० वरुन १५,००० रुपयांपर्यंत वाढ

चंदीगड : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नुकसान भरपाईची रक्कम १२,००० रुपयांवरुन वाढवून १५,००० रुपये करण्याची घोषणा केली आहे. याखालील गटात २५ टक्के रक्कम वाढ करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री खट्टर यांनी सांगितले की, राज्य सरकार देशात सर्वाधिक पिक नुकसानभरपाई देत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरावा असे आवाहन त्यांनी केले.

खट्टर यांनी ट्विटरवर राज्य सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. यामध्ये पिकाचे ७५ टक्के अथवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्यास १२००० रुपये प्रती एकरवरुन १५००० रुपये एकर नुकसान भरपाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, हरियाणातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पिकाचे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्यास १५,००० रुपये प्रती एकर दिले जाईल. यापूर्वी १२,००० रुपये प्रती एकर दिले जात होते. १०,००० रुपये नुकसान भरपाईची रक्कम १२,५००० रुपये करण्यात आली आहे. याखालील गटातही २५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here