रोहाना साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ

मुजफ्फरनगर : साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध असल्याने आयपीएल ग्रुपच्या साखर कारखान्याची गाळप क्षमता १६ हजार क्विंटलवरुन २५ हजार क्विंटल प्रतीदि करण्यात आली आहे. त्यासाठी कारखान्याने ४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

जिल्ह्यात १९३० मध्ये अमृतसरहून आलेल्या मोना सरदार श्याम सिंह यांनी रोहाना विभागात साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्याची गाळप क्षमता १३ हजार क्विंटल प्रती दिन होती. कारखान्यात १९३३ मध्ये गाळप सुरू करण्यात आले होते. त्यानंतर कार्यक्षेत्रात ऊसाचे क्षेत्र वाढले. १९९० मध्ये तत्कालीन समाजवादी पक्षाच्या सरकारने कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी २५ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ही योजना अडकली होती. नंतर बसपा सरकारने साखर कारखाना आयपीएल ग्रुपला विकला होता.

नंतर आयपीएल ग्रुपने कारखान्याची गाळप क्षमता वाढवून १६ हजार क्विंटल प्रती दिन करण्यात आली. आता उसाचे क्षेत्र वाढल्याने कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. एस.गहलोत यांनी पुन्हा कारखान्याचे विस्तारीकरण करण्यासाठी ४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर गाळप क्षमता २५ हजार क्विंटल प्रती दि होणार आहे. गाळप हंगाम दहा नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here