मराठवाड्यात भुजल पातळीत वाढ

औरंगाबाद : ऑक्टोबर मध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा मराठवाड्याची पाणी टंचाई दूर झाल्याचे चित्र दिसत आहे. बारमाही दुष्काळाच्या गर्तेत असणार्‍या मराठवाड्याच्या भुजल पातळीत मोठी वाढ झाली आहे.  ऑक्टोबरमध्ये पडलेलया पावसामुळे मराठवाड्यातील 76 पैकी तब्बल 34 तालुक्यांमधील भुजल पातळीत वाढ झाली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे.

यंदा मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पवसाचा जोर राहिला. या भागात तब्बल 337 टक्के अधिक पास झाला. त्यामुळे लातूर व उस्मानाबाद जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यातील पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. ही वाढलेली भूजल पातळी दिलसादायक असली तरी 42 तालुक्यात सरासरी पावासात घट आहे. यामध्ये सर्वाधिक 10 तालुके लातूर जिल्ह्यातील असून औरंगाबाद, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी आठ, जालना जिल्ह्यातील सात, तर परभणी जिल्ह्यातील एका तालुक्याचा समवेश आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत विभागातील 875 निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात भूजल पातळीत घट किंवा वाढ याची नोंद घेण्यात येते. यंदा मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाचा जोर राहिला. एकाच महिन्यात विभागात तब्बल 337 टक्के अधिक पाऊस झाला. त्यामुळे लातूर व उस्मानाबाद जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यातील पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. वाढलेली भूजल पातळी ही त्या-त्या भागातील शेतकर्‍यांना दिलासा देणारी असली तरीही विभागातील 42 तालुक्यांत सरासरी पावसात घट आहे. यामध्ये सर्वाधिक 10 तालुके लातूर जिल्ह्यातील असून औरंगाबाद, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी आठ, जालना जिल्ह्यातील सात, तर परभणी जिल्ह्यातील एका तालुक्याचा समावेश आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here