मक्का आधारित इथेनॉलच्या खरेदी दरात प्रति लिटर 5.79 रुपयांची वाढ

नवी दिल्ली : मक्यापासून इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) मक्यापासून उत्पादित इथेनॉलसाठी प्रति लिटर 5.79 रुपये (GST वगळून) अतिरिक्त प्रोत्साहन जाहीर केले आहे. त्यामुळे मका-आधारित इथेनॉलची किमत सध्याच्या 66.07 रुपयांवरून 71.86 रुपये प्रति लीटर झाली आहे.

हा दर 5 जानेवारी 2024 नंतर OMCs द्वारे खरेदी केलेल्या सर्व इथेनॉल पुरवठ्यासाठी लागू होईल.वाढीव प्रोत्साहनांमुळे मका-आधारित इथेनॉल उत्पादनात वाढ होणे अपेक्षित आहे. ज्यामुळे देशांतर्गत इथेनॉल उत्पादन क्षमतेत वाढ होईल आणि 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्याच्या भारताचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य गाठले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here