जालन्यातील पाणीसाठ्यात वाढ

जालना : जिल्ह्यातील सात मध्यम व 57 लघुप्रकल्पांत आजघडीला 44.29 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यात सात मध्यम प्रकल्पांपैकी जुई आणि धामना हे दोन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तर मध्यम प्रकल्प पन्नास टक्क्यांचे पुढे भरले आहेत. तीन मध्यम प्रकल्पांमध्ये 25 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
जिल्ह्यात 57 लघुप्रकल्पांपैकी 13 लघुप्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तर सात लघुप्रकल्पांत 50 टक्के पाणीसाठा आहे, तसेच सहा लघुप्रकल्प 25 टक्के व 21 लघुप्रकल्पांत 25 टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा आहे. विहिरी, कूपनलिकांना मुबलक पाणी आहे. यंदा परतीच्या पावसाने जिल्ह्यात मध्यम व लघुप्रकल्पांसह बंधाऱ्यामध्ये मुबलक पाणीसाठा आहे.  तसेच भूजल पातळीही 1.41 मीटरने वाढ झाली आहे. परिणामी जिल्ह्याचा यंदाचा पाणीप्रश्न मिटला आहे.
यंदाही जिल्ह्यात पावसाळ्याचा सुरवातीला अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळाचे ढग कायम राहून भरपावसाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता; तसेच पावसाळ्याही जिल्ह्यात टँकर सुरूच होते; मात्र ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घालत पावसाची वार्षिक सरासरी पार करीत जिल्ह्यात 792.27 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले; परंतु परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सात मध्यम व 57 लघुप्रकल्पांत आजघडीला 44.29 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यात सात मध्यम प्रकल्पांपैकी जुई आणि धामना हे दोन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तर मध्यम प्रकल्प पन्नास टक्क्यांचे पुढे भरले आहेत. तीन मध्यम प्रकल्पांमध्ये 25 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
01/06/2019 ते 02/11/2019 कालावधीतील पर्जन्यमान-
तालुका अपेक्षित सरासरी झालेला पाऊस
जालना 700.95 मिमी 632.52 मिमी
बदनापूर 700.09 मिमी 804.60 मिमी
भोकरदन 662.96 मिमी 1074.87 मिमी
जाफराबाद 640.39 मिमी 784.80 मिमी
परतूर 743.94 मिमी 763.05 मिमी
मंठा 707.36 मिमी 603.25 मिमी
अंबड 651.68 मिमी 939.73 मिमी
घनसावंगी 699.22 मिमी 735.32 मिमी
एकूण 688.32 मिमी 792.27 मिमी

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here