रब्बी हंगामात गहू, तांदळाच्या लागवड क्षेत्रात वाढ

नवी दिल्‍ली : भारतीय शेतकऱ्यांनी मसूर आणि डाळींच्या तुलनेत गहू आणि तांदळाच्या पेरणीला अधिक प्राधान्य दिल्याचे २०२२ मधील रब्बी हंगामाच्या आकडेवारीवरुन दिसून आले आहे. अनियमित मान्सूनमुळे रब्बी हंगामातील पेरणी कमी झाल्याचे मानले जात आहे. मात्र, सध्या गेल्यावर्षीपेक्षा अधिक पेरणी झाल्याचे आकडेवारी दिसून येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत रब्बी हंगामात सात टक्के अधिक पेरण्या झाल्या आहेत.

या हंगामातील महत्त्वाच्या पिकांपैकी एक असलेल्या गव्हाच्या पेरणीत १५ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. भारतामध्ये बफर स्टॉकमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे. याशिवाय, रशिया-युक्रेन युद्धामुळे भू – राजकीय आणि व्यापारी अडचणींमुळे २०२२ मध्ये गव्हाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here