उत्तर प्रदेशातील ऊस क्षेत्रफळामध्ये झाली वाढ

लखनऊ : प्रदेशाचे ऊस आणि साखर आयुक्त संजय आर भूसरेड्डी यांनी सांगितले की, ऊस वर्ष 2019-20 मध्ये झालेल्या ऊस लावडीच्या आधारावर गाळप हंगाम 2020-21 साठी उपलब्ध होणार्‍या ऊसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. प्रदेशातील एकूण ऊस क्षेत्रफळ 27.16 लाख हेक्टर आहे. गेल्या गाळप हंगामाध्ये हे क्षेत्रफळ 26.78 लाख हेक्टर होते. सध्या राज्यातील ऊस क्षेत्रफळामध्ये 1.4 टक्के तसेच ऊसाच्या सरासरी उत्पादनामध्ये 6 कु./हेक्टर ची वाढ नोंद करण्यात आली आहे.

भूसरेड्डी यांनी या संबंधामध्ये विस्तृत माहिती देताना सांगितले की, राज्यातील ऊस क्षेत्रफळामध्ये रोप ऊसाचे क्षेत्रफळ 13.69 लाख हेक्टर अंकलित केले गेले. जे गेल्या वर्षाच्या तुलनेत 2.89 टक्के अधिक आहे. खोडवा ऊसाचे क्षेत्रफळ यावर्षी 13.47 लाख हेक्टर अंकलित केले गेले आहे, जे गेंल्या वर्षाप्रमाणेच आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here