धामपूर साखर कारखान्याच्या ऊस क्षेत्रात ७६२ हेक्टरची वाढ

धामपूर : धामपूर साखर कारखान्याच्यावतीने सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार धामपूर साखर कारखान्यातील उसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्के म्हणजेच ७६२ हेक्टरने वाढले आहे. गेल्यावर्षी ५०,२३६ हेक्टर जमिनीत ऊस पिक होते. आता वाढून ते ५०,९९८ हेक्टर झाले आहे.

धामपूर साखर कारखान्याचे ऊस विभागाचे सरव्यवस्थापक ओमवीर सिंह यांनी सांगितले की, धामपूर साखर कारखाना आणि ऊस विभागाने १५ जून ते ३१ जुलै या कालावधीत सर्व्हे केला आहे. या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाच्या क्षेत्रात तीन टक्क्यांची वाढ दिसली आहे. शेतकऱ्यांनी सीओ ०२३८ या प्रजातीची लागवड केली आहे. या उसाची उत्पादन क्षमता खूप आहे. ऊसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता गृहीत धरून साखर कारखाना प्रशासनाने गळीत हंगाम दहा दिवस आधी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी ३१ ऑक्टोबर रोजी गळीत हंगाम सुरू करण्यात आला होता. यंदा २१ ऑक्टोबरला कारखाना सुरू करण्यात येणार आहे.

साखर कारखान्याचे वरिष्ठ व्यवस्थापक मनोज चौहान यांनी सांगितले की, धामपूर कारखान्याने गेल्यावर्षी २१९ दिवस गाळप करून २३९ लाख क्विंटल उसाचे गाळप करुन देशात पहिला क्रमांक पटकावला. साखर कारखान्याने शेतकऱ्यांना शंभर टक्के म्हणजे ७६४.३० लाख रुपये उसापोटी दिले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here