ग्रीन पॉवर शुगर्सच्या कार्यक्षेत्रात ऊस लागवडीत वाढ: देशमुख

सातारा : ग्रीन पॉवर शुगर्स लि. गोपूजचे २०२३ – २०२४ गळीत हंगामासाठीच्या मिल रोलरचे पूजन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व कारखान्याचे मुख्य प्रवर्तक संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी देशमुख म्हणाले, साखर कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाची उपलब्धता आहे. आगाम गाळप हंगामामध्ये उच्चांकी ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे, असेही देशमुख म्हणाले. आगामी गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस नोंदी, ऊस तोडणी वाहतूक करार सुरु आहेत. यावेळी जनरल मॅनेजर हणमंतराव जाधव, महेश घार्गे, ईश्वर कारंडे, धनाजी घार्गे, अनिल रेणुशे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here