खानदेशात यंदा ऊस लागवडीत वाढ

जळगाव : यंदा खानदेशात २७ हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १४ हजार हेक्टर, नंदुरबार जिल्ह्यात १२ हजार हेक्टर आणि धुळ्यात चार हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. आणखी सुमारे ५०० ते ६०० हेक्टरवर लागवड होण्याची शक्यता आहे.

खानदेशात गेली दोन चांगला किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तापी, सुसरी नदीच्या लाभक्षेत्रात जलसाठे मुबलक आहेत. त्यामुळे ऊस लागवड वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, चाळीसगाव तालुक्यात ऊसाची जादा लागवड झाली आहे. यावल, मुक्ताईनगर भागातही ऊस लागवड स्थिर आहे. नंदुरबार जिल्ह्यात जादा साखर कारखाने आहेत. मध्य प्रदेश, गुजरातमधील कारखानेदेखील येथील ऊस खरेदी करतात. त्यामुळे नंदुरबारमध्ये लागवड अधिक आहे.

नाशिक, औरंगाबाद, नगरमधील कारखाने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा भागातील ऊस खरेदी करतात. शिवाय भोरस येथेही साखर कारखाना सुरू झाला आहे. इतर पिकांची स्थिती बेभरवशाची झाली आहे. दरही परवडत नाहीत. त्यामुळे शेतकरी उसाकडे वळत आहेत. धुळ्यातून मध्य प्रदेश, नाशिक भागातील कारखाने उसाची खरेदी करतात. त्यामुळे धुळ्यातही शिरपूर, धुळे, साक्री तालुक्यात ऊस पीक वाढले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here