ऊस उत्पादन आणि साखर रिकवरी वाढवण्यासाठी वैज्ञानिक आणि कारखाना संचालकांचा सामाईक कार्यक्रम करण्यावर भर

कुशीनगर (उत्तर प्रदेश) : ऊस विकास परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्र राय म्हणाले की,ऊसाची निर्मिती आणि साखर रिकवरी वाढवण्यासाठी कृषी वैज्ञानिक तसेच कारखाना संचालकांना सामाईक कार्यक्रम घेणे आवश्यक आहे. असे कार्यक्रम केल्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पान्नात वाढ होईल.

गेल्या आठवड्यात गुरुवारी राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशन योजनेअंतर्गत गेंदा सिंह ऊस संशोधन आणि प्रजनन संस्था येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात पूर्वी उत्तर प्रदेशातील अनेक साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले.

संस्थेतील प्रभारी अधिकारी डॉ. वाईपी भारती म्हणाले की, संस्था लागवडीसाठी मातीची तपासणी, योग्य बियाण्यांची निवड आणि वेळेत लागवड केल्याने उत्पादन अधिक होते. ट्रंच पद्धतीच्या उस लागवडीमुळे इतर पिकांनाही फायदा होतो. उत्तम प्रकारची बियाणे शेतकर्‍यांना उपलब्ध केली गेली जावीत. संस्था या बाबीवर काम करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here