उत्तर प्रदेशमध्ये ऊस लागवड क्षेत्रात ४ टक्के वाढ

लखनौ : देशातील सर्वात मोठा ऊस उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये आगामी हंगामात बंपर पिक उत्पादन होण्याची शक्यता आहे. ऊसाच्या शेतीमध्ये एकूण क्षेत्रात वार्षिक तुलनेत ३-४ टक्क्यांनी वाढ होण्याचे अनुमान आहे.
फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हंगाम २०२२-२३ (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी ऊस लागणीस सातत्याने गती येत आहे. ऊसाच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना भात, गव्हाऐवजी ऊस लागवडीला प्रोत्साहन मिळत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यात २०२२-२३ मध्ये ऊस शेती एकूण २.९३ मिलियन हेक्टरवर असेल असे अनुमान आहे. आधीच्या २०२१ -२२ या हंगामात २.८४ मिलियन हेक्टर एवढे लागवड क्षेत्र होते. ऊसाचे एकूण क्षेत्र २०२०-२१ मध्ये २.७६ मिलियन हेक्टर आणि २०१९-२० मध्ये २.७४ मिलियन हेक्टर एवढे राहिले.

साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना कालबद्ध पद्धतीने ऊस बिले मिळत असल्याने शेतकऱ्यांची ऊस लागणीकडे रुची वाढली आहे. ऊस विभागाने शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या बियाण्यांची सुलभ उपलब्धता केली आहे. ऊस विभागाने नर्सरीत ऊसाच्या नव्या प्रजातींची रोपे तयार करण्यासाठी महिला स्वयंसाह्यता गटांना काम दिले आहे. शेतकऱ्यांना सुलभ अटींवर खते, किटकनाशकांसह इतर वस्तू दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here