माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत वाढ

माजलगाव : परतीच्या पावसाला चांगलाच जोर आल्यामुळे गेल्या 15 दिवसात या पावसाने पुन्हा एकदा चांगलाच धूमाकूळ घातला आहे. या दमदार पावसामुळे माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. दि. 7 ऑक्टोबर रोजी हे धरण मृतसाठ्यातून बाहेर पडले. यावेळी या धरणात 426.11 मीटर एवढा पाणीसाठा होता. मंगळवारी दुपारी 426.56 मीटर पाणी पातळीत वाढ होवून ती 427.10 मीटर झाली होती. मंगळवारी दुपारपर्यंत धरणाची पाणी पातळी 12 टक्के झाल्याने बीड व माजलगााव शहरासह अनेक गावाचा पाणीप्रश्‍न सुटणार आहे. तसेच शेतकरी वर्गातही आनंद आहे.

गेल्यावर्षी हे धरण पावसाळा संपला तेव्हा धरणात 126.10 दलघमी ऐवढाच एकूण पाणीसाठा होता. यावेळी धरण मृतसाठ्याखालीच होते. धरणाची पाणी पातळी वाढल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे. यावर्षी उन्हाळ्यात प्रचंड दुष्काळ पडला, धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. हे धरण भरण्यासाठी 431.80 मीटर एवढे पाणी लागते. 30 जून रोजी या धरणाची पाणी पातणी 423.00 मीटर झाली होती.

धरणक्षेत्रात चांगला पाउस झाल्याने व पैठण येथीव जायकवाडी धरणातून 13 ऑगस्टपासून सोडण्यात आल्याने 94.40 दलघमी पाणी साठा झाला होता. तर 424.38 मीटर एवढी पाणी पातळी धरणात झाली होती. मागील दोन दिवसात धरण क्षेत्रात चांगला पाउस झाला आणि आजही चांगला पाउस झाल्याने धरणाची पाणी पाळी वाढली आहे. असाच पाउस सुरु राहिल्यास धरण भरु शकेल असा अंदाज आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here