उजनी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ, २१ हजार क्युसेक्सचा विसर्ग

257

बेंबळे : उजनी धरणातून आज पहाटे २१ हजार क्यूसेकने भीमानदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उजनी धरणातल्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे उजनीतून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या उजनी धऱण पाणलोट क्षेत्रात  एका रात्रीत २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व 19 धरणे शंभर टक्के भरली आहेत. गुरुवारपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची धुवाँधार बरसात सुरू असल्याने पुणे जिल्ह्यातील धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्रात एका रात्रीत 25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाळ्यात ‘उजनी’ जलाशय परिसरात केवळ 225 मि.मी. इतकी पावसाची नोंद आहे.

भीमा खोऱ्यातील धरण परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी होत असल्याने तेथे जमा होणारे पाणी खालील भागात थेट सोडण्यात येत आहे. परिणामी ‘उजनी’ कडे येणाऱ्या पाण्यात लक्षणीय वाढ होत आहे. बंडगार्डन विसर्गही वाढण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उजनी धरण प्रशासनानेउजनीतून भीमा नदीत विसर्ग सोडण्यास सुरुवात केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here