मुजफ्फरनगरमध्ये वाढले ऊसाचे क्षेत्र

58

मुजफ्फरनगर : गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशमध्ये उच्चांकी ऊस आणि साखर उत्पादन होत आहे. उत्तर प्रदेशला देशातील पहिल्या क्रमांकाचे साखर उत्पादक राज्य बनविण्यात मुझफ्फरनगर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील ऊस उत्पादक क्षेत्र २०२१-२२ मध्ये वाढून १,६८,०१५ लाख हेक्टर झाले आहे. शेतकऱ्याचा ऊस उत्पादनातील उत्सुकता वाढली आहे. जिल्हा ऊस अधिकारी आर. डी. द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६-१७ मध्ये उसाचे क्षेत्र १,२६,९७२ लाख हेक्टर होते. तर २०२१-२२ मध्ये हेच क्षेत्र १,६८,०१५ लाख हेक्टरवर पोहोचले आहे.

गळीत हंगाम २०१७-१८ मध्ये ऊस लागवड क्षेत्र १,३१,९५४ लाख हेक्टर होते. गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये उसाचे लागवड क्षेत्र १,३९,२२१ आणि आता यंदाच्या हंगामात ते १,६८,०१५ वर पोहोचले आहे. गेल्या पाच वर्षातील गळीत हंगामात ऊसाच्या शेती क्षेत्रात ४० हजार हेक्टरची वाढ झाली आहे. यादरम्यान जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी २०२१-२२ या हंगामासाठीच्या गाळपाची तयारी सुरू केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here