पेट्रोल, डिझेलवर एक्साईज ड्यूटी वाढवली

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर घसल्यामुळे तेल कंपन्यांचा फायदा होत होता. पण आता केंद्र सरकारने पेट्रोलवर 10 आणि डिझेलवर 13 रुपये प्रति लिटर अशी एक्साईज ड्यूटी वाढवल्यामुळे पेट्रोल पंपावरील किंमती यामुळे बदलणार नाहीत. घसरलेल्या तेलाच्या किमंतींसोबत ही जोडण्यात येईल आणि दरांची बरोबरी होईल. या एक्साईच ड्यूटीमुळे ग्राहकांवर काहीही परिणाम होणार नाही. हा नियम आजपसून (दि.6) लागू होणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या घसरलेल्या किंमतींचा फायदा घेत येत नसल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अप्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळ आणि कस्टम विभागाने सांगितल्यानुसार, पेट्रोलवर रोड सेस 8 रुपये आणि विशेष अबकारी कर 2 रुपयांनी वाढवला आहे. तर डिझेलवर सेस 8 आणि अबकारी कर 5 रुपयांनी वाढवला आहे. यामुळे पेट्रोवरील एक्साईज ड्यूटी 32.98 लिटर, तर डिझेलवरील 31.83 रुपये प्रति लिटर झाली आहे.

मुंबईत पेट्रोलचे दर 76.31 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 66.21 रुपये प्रति लिटर इतके आहेत. तेलाच्या किमंती घसरल्या असल्याने महसूलही कमी झाला आहे. तोेच महसूल या दरातून मिळवण्यासाठी सरकारने 2014 ते 2016 या काळात 9 वेळा एक्साईज ड्यूटी वाढवली होती. दरम्यान, तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर ऑक्टोबर मध्ये एक्साईज ड्यूटी 2 रुपयांनी कमीही केली होती. पण 2019 मद्ये पुन्हा हा कर वाढवण्यात आला. सध्याच्या कोरोना आणि त्यासोबत आलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या नवीन कर वाढीमुळे कदाचित सरकारच्या महसूलात भर पडण्याची शक्यता आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here