नव्या जातीच्या ऊसाकडे शेतकऱ्यांचा वाढला कल

देवरिया : जिल्ह्यामध्ये ऊस शेतकर्‍यांनी नव्या जातीच्या ऊसाच्या शेतीकडे आपला कल वळवला आहे. कमी मूल्यामध्ये चांगल्या उत्पादनामुळे शेतकर्‍यांची रुची वाढली आहे.

सध्याच्या काळात शेतकरी ऊसाच्या पीकाबरोबर अनके पीकांची लागवड करुन चांगला लाभ मिळवत आहेत. चांगले उत्पादन मिळाल्यामुळे पुन्हा एकदा शेतांमध्ये उसाचे पीक लहरु लागले आहे.

जिल्ह्यामध्ये ऊस शेतकर्‍यांमध्ये सर्वाधिक मागणी सीओ 238, सीओ 118, सीओ 8272, 98134, 1523, 1511 आदी सामिल आहेत. या जातींचे एका हेक्टरमध्ये एक हजार क्विंटल उत्पादन आहे. यामुळे कमी मूल्यात चांगले उत्पादन मिळत आहे.

ऊस लागवडीदरम्यान हवामानानुसार बटाटे, हरभरा, मटार, कांदा, लसूण, मूग, उडीद, दुधीभोपळा याशिवाय इतर भाज्यांची लागवड करुन लाभ घेत आहेत.

जिल्हा ऊस अधिकारी आनंद कुमार शुक्ल यांनी सांगितले की, ऊस लागवड करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये बैतालपूर क्षेत्रातील अवधेश मणि त्रिपाठी, प्रातपपूर येथील पारसनाथ कुशवाहा, जगरनाथ कुशवाहा, गौरीबाजार येथील हीरालाल यादव यांच्यासह डझनभर शेतकर्‍यांनी नव्या जातिच्या ऊसाची लागवड केली आहे. यावर्षी शेतकर्‍यांनी 10,525 हेक्टर क्षेत्रफळामध्ये ऊस लागवड केली आहे. ज्यामध्ये सर्वाधिक नव्या जातिचा ऊस आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here