ऊस तोड मजुरांसाठी स्वतंत्र बोर्डाची गरज: प्रकाश आंबेडकर

131

पाथर्डी: ऊसतोड मजुरांचे अनेक प्रश्‍न अजूनही प्रलंबित आहेत. ऊस मजुर, मुकादम आणि वाहतुकदारांच्या दरवाढीचा प्रश्‍न कायम निर्माण होतो. याबाबत विधानसभेत कायदा निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन कायदा करुन माथाडी कामगरांच्या बोर्डाप्रमाणे नव्या बोर्डाची स्थापना करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
खरवंडी कासार येथील श्री क्षेत्र भगवानगडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले , ऊसतोड मजुरांसाठी बोर्ड स्थापन करण्याबाबत स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याशी चर्चा झाली होती,ते अनुकूल होते पण आता माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला असला तरी त्यांना पक्षातून विरोध आहे.

साखर कारखान्यांना ऊसतोड मजुर, मुकादम आणि वाहतुकदारांची गरज आहे. साखर कारखानदार आणि संचालक मंडळाचे राजकारण कारखानदारीवर चालते यामुळे कारखान्यामध्ये जाण्याची लगेचच घाई करु नका. सुरु असणारा संप तसाज अजून लावून धरा, असे आवाहन त्यांनी केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here