युपीत सत्तेवर आल्यानंतर ऊस थकबाकी देण्यासाठी बजेटमध्ये स्वतंत्र निधी : अखिलेश यादव

लखनौ : जर आमचे सरकार सत्तेवर आले तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतुद अर्थसंकल्पात केली जाईल अशी घोषणा समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. यादव यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या अधिकारांपासून राज्य सरकारने वंचित ठेवल्याचा आरोप करत टीकेची झोड उठवली. सहारनपूर येथील एका मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात शामलीपासून मुझफ्फरनगरपर्यंत चौपदरी महामार्ग उभारला जाईल असेही जाहीर केले.

ते म्हणाले, लखीमपूर खिरीतील घटनेमागे सरकारचे लोक आहेत. सध्याच्या सरकारचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सणाच्या कालावधीनंतर त्यांचा उलट प्रवास सुरू होईल.

समाजवादी पक्षाचे खासदार चौधरी यशपाल सिंह यांच्या जन्मशताब्दीवर त्यांच्या योगदानाचा उल्लेख करत अखिलेश म्हणाले, ते एक असे नेते होते, जे शेतकरी आणि गरीबांच्या अधिकार आणि सन्मानासाठी लढले. तसे धाडस त्यांच्यामध्ये होते. मला विश्वास वाटतो की जे लोक त्यांचे अनुकरण करताहेत, ते आता आपल्या अधिकारांची लढाई करण्यासाठी समाजाला एकत्र आणतील. यावेळी सपाचे नेते प्रा. सुधीर पवार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना ऊस बिलांच्या पूर्ततेसाठी पक्षाध्यक्ष अखिलेश यांनी स्वतंत्र बजेटची घोषणा केली आहे. त्यांचा पक्ष शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी समर्पित आहे हे यातून दिसून येते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here