निर्देशांकही महागाईच्या कचाट्यात

मुंबई: महागाईचे वातावरण व औद्योगिक उत्पादनात नोंदवलेली घट यामुळे गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झाला व त्यांनी समभागविक्रीचा पवित्रा स्वीकारला. यामुळे सेन्सेक्सवर सतत दबाव होता. आयटीसीच्या समभागाला सर्वाधिक फटका बसला. हा समभाग 1.97 टक्क्यांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 32 अंकांच्या घसरणीसह 12053चा स्तर गाठला.

गेल्या आठवड्यातील अखेरच्या तीन सत्रांमध्ये साधलेल्या तेजीनंतर चालू आठवड्याच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्सने गटांगळ्या खाल्ल्या. ऊर्जा, दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि वाहन कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 70 अंकांनी घसरून 40938 वर स्थिरावला. गेल्या आठवड्यात समाधानकारक कामगिरी नोंदवणार्‍या रुपयाचीही सोमवारी घसरण झाली. 17 पैशांनी घसरलेल्या रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 71 असा नवा दर नोंदवला.
टाटा स्टील, एचयूएल, वेदांता, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा आदी समभागांचे मूल्यही कोसळले. दुसरीकडे, टीसीएसच्या समभागाने 2.7 टक्क्यांची कमाई साधली. टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक हे समभागही वधारले.

यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here