भारत आणि बांग्लादेशाला कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्याची गरज: मंत्री पीयूष गोयल

नवी दिल्ली: वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, भारत आणि बांग्लादेशाला कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सहकार्याने काम करणे गरजेचे आहे, कारण या क्षेत्रामध्ये दोन्ही देशांजवळ विकासाची बरीच क्षमता आहे. मंत्री गोयल यांनी सांगितले की, कृषी एक असे क्षेत्र आहे जिथे आम्हा दोघांना अधिक ताळमेळ आणि सहकार्याने काम करणे आवश्यक आहे. सीआयआय कडून आयोजित भारत बांग्लादेश डिजिटल समंनेलनामध्ये त्यांनी आपले म्हणणे सांगितले.

बांग्लादेशाचे वाणिज्य मंत्री टीपू मुंशी यांनी मालवर निर्यात प्रतिबंध लावण्यापूर्वी भारताला बांग्लादेशाला सूचित करण्याची विनंती केली. गोयल यांनी सांगितले की, भारत पुरेसा बफर स्टॉक बनवणे आणि वाढवण्याच्या माध्यमातून कांदा आणि बटाट्यावर निर्यात प्रतिबंधांच्या समस्येला दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गोयल यांनी सांगितले की, भारताने बांग्लादेशाच्या अनेक उत्पादांसाठी शुल्क मुक्त बाजार सादर केला आहे, ज्यामध्ये कृषी निर्यातही सामिल आहे, तसेच त्यांनी बांग्लादेशाला बाधामुक्त व्यापार निश्‍चित करण्यमध्ये पूर्ण सहकार्याचे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here