जागतिक स्तरावर साखरेच्या किमती वधारल्याचा भारताला फायदा

243

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठा साखर पुरवठादार देश ब्राझिलमध्ये साखरेच्या उत्पादनात झालेली घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वधारल्याचा जास्त फायदा भारताला होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात जागतिक बाजारपेठेत २० टक्के वाढ झाली आहे. ब्राझीलमधील उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत ७-८ मिलनय टन कमी होण्याची शक्यता आहे. तर थायलंडमध्येही ७ ते ८ मिलियन टन उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजने (एनएफसीएसएफ) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची स्थिती पाहता निर्यातीचा कोटा वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. क्रडच्या दरात झालेली वाढ पाहता ब्राझिलकडे इथेनॉल उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. एनएफसीएसएफचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की, साखरेच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्या आहेत.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) माहितीनुसार, साखरेच्या निर्यातीचे ५४ -५५ लाख टनाचे करार करण्यात आले आहेत. २०२०-२१ च्या हंगामात एकूण एमएईक्यू ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यामध्ये २५.२४ लाख टन साखर निर्यात देशाबाहेर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here