भारताने परबोल्ड तांदळावरील 20% निर्यात शुल्काची मुदत 31 मार्च 2024 पर्यंत वाढवली

नवी दिल्ली : भारत सरकारने शुक्रवारी (13 ऑक्टोबर, 2023) जाहीर केले की, परबोल्ड तांदूळावरील 20% निर्यात शुल्काची मुदत आता 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंदी सुरुवातीला 25 ऑगस्ट रोजी परबोल्ड तांदूळावरील 20% निर्यात शुल्काची मुदत 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत लागू करण्यात आली होती. पुरेसा स्थानिक तांदूळ साठा सुनिश्चित करण्यासाठी आणि देशांतर्गत किमती नियंत्रित करण्यासाठी हे निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमुळे भारत सरकार बिगर बासमती तांदळाच्या किमतीवर नियंत्रण ठेवू शकले. भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण तांदळाच्या 25 टक्के वाटा गैर-बासमती तांदळाचा आहे.

मोदी सरकार गेल्या वर्षभरापासून अन्नधान्य महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याआधी सरकारने सणासुदीच्या काळात तांदळाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. सप्टेंबर 2023 मध्ये खाद्यपदार्थांच्या किमती घसरल्यानंतर किरकोळ महागाई दरात मोठी घट झाली असून महागाई निर्देशांक 5.02 टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये ते 6.83 टक्के होता, तर जुलै 2023 मध्ये महागाई निर्देशांक 15 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर 7.44 टक्के होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here