मोदी सरकारला मिळाली ’स्विस बँके’च्या खातेदारांची लिस्ट, ’ब्लॅकमनी’च्या कुबेरांचा होणार ’पर्दाफाश’

नवी दिल्ली : परदेशातून काळ्या पैशांची माहिती मिळवण्यात मोदी सरकारला यश मिळाले आहे. स्वित्झर्लंड सरकारने भारत सरकारला बँकेच्या खात्याशी संबंधित माहिती दिली आहे, स्वित्झर्लंडकडून स्विस बँकमधील भारतीय खात्यांची माहिती सरकारकडे सोपवली आहे. भारत निवडक देशांमधील एक देश आहे ज्याला ही माहिती मिळाली आहे.

स्वित्झर्लंडच्या टॅक्स विभागानुसार यानंतर भारत सरकारला पुढील माहिती 2020 ला देण्यात येईल. माहितीनुसार स्वित्झर्लंडमध्ये जगभरातील 75 देशातील 31 लाख जणांची खाती आहेत, यात भारतातील देखील खाती आहेत. सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, जी माहिती मिळाली आहे त्यात सर्व खाती बेकायदेशीर नाहीत. सरकारी एजेंसी आता या संबंधित तपास करेल. ज्यात खातेदाराचे नाव आणि खात्यातील माहिती घेण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

परदेशात असलेला काळा पैसा परत भारतात आण्यासाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलेले आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणूकांत हा मोठा मुद्दा होता. माहिती मिळवण्यासाठी सरकारने स्वित्झर्लंडच्या सरकार बरोबर अनेकदा संपर्क साधले. त्यानंतर या काळा पैशाच्या लढ्यात यश आले आहे. जून 2019 मधील स्विस नॅशनल बँकच्या रिपोर्टनुसार, स्विस बँकेत भारतीयांकडून ठेवण्यात येणार्‍या पैशांत कमी आली होती. 2018 च्या आकडेवारी नुसार भारतीयांचे 4757 कोटी रुपये स्विस बँकेत आहेत, यात काळा पैसा किती आहे याची माहिती स्विस बँकेकडून देण्यात आली नाही.

रिपोर्टमधून समोर आले की, स्विसने भारत सरकारला सोपवलेल्या माहितीवरुन बँकेत पैसे ठेवणार्‍यांविरोधात केस तयार केली जात आहे. स्वित्झर्लंडकडून त्या प्रत्येक खात्याचे व्यवहार देण्यात आले होते जे 2018 मध्ये एकदा तरी वापरण्यात आले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here